Home Maharashtra Breaking News । अखेर एमपीएससी कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत...

Breaking News । अखेर एमपीएससी कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर

520

मुंबई ब्युरो : एमपीएससी आयोगाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. अखेर दोन वर्षांनंतर एमपीएससीकडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक या दोन ठिकणी मुलाखती घेतल्या जाणार आहे. 4 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरदरम्यान या मुलाखती होणार आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्यानं नैराश्यातून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती. त्यानंतर राज्य सरकारवर सर्व स्तरातून जोरदार हल्ला चढवण्यात आला होता.

त्याचबरोबर एमपीएससी भरतीसंदर्भात 30 तारखेच्या आत मंजूर पदांचा आढावा घेऊन एमपीएससीला मागणीपत्र पाठवा असा निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागांना दिले आहेत. राज्य सरकार एमपीएससी आयोगाला जागेसंदर्भात मागणीपत्र देत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात होता. विद्यार्थ्यांची मागणी पाहता मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत मागणीपत्र सादर करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता 30 तारखेच्या आत मागणीपत्र सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पास होऊनही या 118 उमेदवारांची नियुक्ती रद्द झाली होती

परीक्षेत पास होऊनही या 118 उमेदवारांची नियुक्ती रद्द झाली होती. 11 सप्टेंबर, 2019 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरकारकडे शिफारस केलेल्या सर्व 832 उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील, अशी माहिती दिवाकर रावतेंनी दिली.याशिवाय या यादीमधून वगळण्यात आलेल्या 118 उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्यात येईल.

साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत राज्य शासनातील साडे पंधरा हजार पदांची भरती करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिला होता. त्यासाठी ‘एमपीएससी’ आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सातत्याने बैठका घेत, या भरती प्रक्रियेतील त्रुटी आणि अडचणी दूर करत त्याचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने केला. त्यामुळे या भरती प्रक्रियेला गती मिळाली.

रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले होते

राज्य शासनाच्या विविध विभागांची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची रिक्त कार्यकारी पदे तातडीने भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश दिले होते. गट ‘अ’, गट ‘ब’ व गट ‘क’ श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात आली. ‘एमपीएससी’मार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील वर्ष 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता मिळाली. सर्वच विभागांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिले.

Previous articleBollywood News | थ्री इडियट्स से लेकर तुम्हारी सुलु जैसे हिंदी सुपरहिट फिल्मों का साउथ में बन चुका है रीमेक
Next articleथैंक यू यूजर्स : ‘आत्मनिर्भर खबर डॉट कॉम’ के विज़िटर्स 2 लाख पार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).