Home National Nitin Gadkari । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी घेणार...

Nitin Gadkari । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी घेणार ‘दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे’च्या कामाचा आढावा

678

दोन दिवसांचा दौरा आजपासून सुरु, आज हरियाणातल्या सोहना गावात जाणार

नवी दिल्ली ब्युरो : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज आणि उद्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे च्या कामांचा आढावा घेणार आहेत. हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील हायवेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. गडकरींच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यातील पहिला कार्यक्रम हा आज (16 सप्टेंबर) सकाळी 8 वाजता हरियाणातल्या सोहना या गावात आहे.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे ची वैशिष्ट्ये काय?

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा देशातला सर्वात मोठ्या लांबीचा एक्सप्रेस वे आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईमधलं दळवळण सुकर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. एकूण 1380 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे असून याच्या विकासासाठी 98 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सन 2018 मध्ये या एक्सप्रेस वे च्या कामाला मंजुरी देण्यात आली होती.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे च्या कामाचे 9 मार्च 2019 रोजी भूमिपूजन करण्यात आलं. हा हायवे दिल्ली-हरयाणा-राजस्थान-गुजरात-मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यांना कव्हर करतो. या हायवेच्या माध्यमातून दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमधील आर्थिक विकासाला चालण्या देण्यात येणार आहे. या हायवेच्या आजूबाजूला असणाऱ्या जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जेन, इंदोर, अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत या शहरातील आर्थिक क्रियांना अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.

Previous articleआजादी का अमृत महोत्सव | हैदराबाद से नागपुर पहुंची साइकिल रैली का सीआरपीएफ ने किया स्वागत
Next articleSpace Tourism | एलन मस्क की कंपनी ने रचा इतिहास, 4 आम लोगों को रॉकेट से अंतरिक्ष में भेजा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).