Home Bollywood Morning News । सोनू सूदच्या घरात आयकर विभागाची झाडाझडती; पहाटेच्या सुमारास अधिकारी...

Morning News । सोनू सूदच्या घरात आयकर विभागाची झाडाझडती; पहाटेच्या सुमारास अधिकारी बाहेर पडले

559
मुंबई ब्युरो : बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याच्या घर आणि कार्यालयावर बुधवारी आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर तब्बल 20 तास सोनू सूदच्या घरी झाडाझडती सुरु होती. माहिती मिळते आहे की अखेर गुरुवारी पहाटेच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी एक-एक करुन घरातून बाहेर पडले.

आयकर विभागाने बुधवारी सकाळ पासून सोनू सूद याच्या निवासस्थान, कार्यालय आणि हॉटेलवर छापे टाकायला सुरुवात केली होती. त्यापैकी घरातील झाडाझडतीची मोहीम तब्बल 20 तास सुरु होती. यावेळी घरात सोनू सूद, त्याचे कुटुंबीय आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता. आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे सोनू सूदच्या घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या हातात काही फाईल्स होत्या.

लॉकडाऊन मध्ये बनला गरिबांचा मसिहा

गेल्यावर्षी देशात कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागले तेव्हा सोनू सूद गरिबांचा मसिहा म्हणून उदयाला आला होता. लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि प्रवासाची इतर सार्वजनिक साधने बंद झाल्याने अनेक मजूर मुंबईत अडकून पडले होते. त्यावेळी सोनू सूद याने स्वखर्चाने या सर्व मजूरांसाठी विशेष बसची सोय केली होती. त्यामुळे सोनू सूद प्रचंड चर्चेत आला होता.

सूदकडे एकूण 130 कोटींची संपत्ती?

माहिती नुसार सोनू सूदकडे एकूण 130 कोटींची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. ज्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे. ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्याने सलमान खानसोबत ‘दबंग’ या चित्रपटामध्येही काम केले आहे. त्याचवेळी शाहरुख खानसोबत ‘हॅपी न्यू इयर’ मध्ये काम केले होते. सोनू आपल्या पत्नी आणि मुलांसमवेत मुंबईत राहतो. सोनू सूद याच्या पत्नीचे नाव सोनाली सूद आहे. सोनू नागपुरात शिकत असताना त्याची सोनालीशी भेट झाली. याचदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी 1996 मध्ये लग्न केले.

सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला भागात 2600 चौरस फुटांच्या घरात राहतो. सोनूचे हे घर जवळपास 4 बीएचके आहे. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याच वेळी, त्याचे जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. याशिवाय सोनूचे मुंबईतही काही कॉफी पॉईंट्स आहेत. जिथे बसून लोक कॉफी पीत संध्याकाळचा आनंद घेतात.

सोनू सूदकडे एक मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय कार आहे. या कारची किंमत 66 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे ऑडी क्यू 7 ही कार देखील आहे. या गाडीची किंमत 80 लाख रुपये आहे. इतकेच नाही, तर त्याच्याकडे पोर्शची पनामा कार देखील आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे. सोनू सूदला इशांत आणि अयान नावाचे दोन मुलं आहेत, ते कधीकधी वडिलांसोबत फिरताना दिसतात.

Previous articleOBC Reservation । ‘हे तर उशिरा सुचलेलं शहाणपण’, राज्य सरकारच्या अध्यादेशाच्या निर्णयावर बावनकुळे यांची टीका
Next articleआजादी का अमृत महोत्सव | हैदराबाद से नागपुर पहुंची साइकिल रैली का सीआरपीएफ ने किया स्वागत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).