Home Social Nagpur News । ह्युमॅनिटी च्या रुपाली टिचकुले यांनी सामाजिक जाणिवेतून साजरा केला...

Nagpur News । ह्युमॅनिटी च्या रुपाली टिचकुले यांनी सामाजिक जाणिवेतून साजरा केला वाढदिवस

नागपूर ब्युरो : आज सगळीकडेच वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करताना आपण बघतो. चिमुकल्यापासून तर मोठ्यांपर्यंत सगळेजण आपआपल्यालापरीने वाढदिवस साजरा करून लाखो रुपये खर्च करीत पैश्याची उधळण करतात. परंतु यासर्व गोष्टीला फाटा देत ह्युमॅनिटी सोशल फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष रुपाली पंकज टिचकुले यांनी अनावश्यक खर्च टाळत वाढदिवसाच्या पैशातून ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे व शिक्षणात रुची निर्माण व्हावी या हेतूने वह्या, पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य वितरित करून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या आगळ्या -वेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पूजा मानमोडे या ह्युमॅनिटी सोशल फाऊडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वात ह्युमॅनिटी सोशल फाऊडेशनतर्फे नेहमीच गोरगरीब, सर्वसामान्य लोकांना मदत करून सामाजिक कार्य केल्या जाते. गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य देणे, तृतीय पंथीयांना समाजामध्ये समानतेची वागणूक मिळावी म्हणून सातत्याने उपक्रम घेतल्या जातात. महिलांकरीता वेग-वेगळे उपक्रम राबविणे, गोरगरिबांना अन्न-धान्य वितरित करणे, नवरात्रीमध्ये नऊ दिवस गरजूंना मदत करणे यासारखे विविध कार्य सातत्याने करीत असतात.

त्यामुळे फाऊंडेशनमधील प्रत्येक सदस्यांनी जनसेवेचा वसा हाती घेतला असून वाढदिवसाला वायफळ खर्च न करता त्याच पैश्यातून गरीब गरजू मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करीत समाजापुढे एक आदर्श ठेवला. या उपक्रमात पूजा मानमोडे, रुपाली टिचकुले, अबोली येनुरकर, आरती माटे यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here