Home Banking UPI Payments । इंटरनेटचा वापर न करता देखील युपीआय पेमेंट करणं शक्य...

UPI Payments । इंटरनेटचा वापर न करता देखील युपीआय पेमेंट करणं शक्य आहे

516

मुंबई ब्युरो : डिजिटल पेमेंट आता आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. विशेषकरून तरुणाई या डिजिटल पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहे. युपीआय पेमेंट म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (Unified Payments Interface) सुविधेमुळे आपल्या आयुष्यातील अनेक कामं सुरळीत झाल्याचं दिसून येतंय. पण युपीआय पेमेंटचा वापर करायचा म्हणजे इंटरनेट हवं. अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते आणि मग आपल्याला नाईलाजास्तव कॅश व्यवहार करावा लागतो. पण इंटरनेट नसलं तरी आता युपीआय पेमेंट करता येणं शक्य आहे. “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” वर जाणून घ्या हे कसे शक्य आहे.

इंटरनेट शिवाय कसं करायचं युपीआय पेमेंट?
  1. सर्वप्रथम आपला मोबाईल क्रमांक आपल्या अकाऊंटला कनेक्ट असायला हवा.
  2. पेमेंट करण्यासाठी त्यावर *99# डायल करा.
  3. त्या ठिकाणी आपल्याला अनेक पर्याय दिसतील. 1 हा क्रमांक प्रेस करुन सेंड करा.
  4. ज्या माध्यमातून आपल्याला पेमेंट करायचं आहे ते माध्यम निवडा.
  5. जर मोबाईल नंबर वर पैसे सेंड करायचे असतील तर 1 हा क्रमांक प्रेस करा. या ठिकाणीही संबंधित व्यक्तीचा
  6. मोबाईल क्रमांक त्याच्या अकाऊंटला कनेक्ट असायला हवा.
  7. त्यानंतर रक्कम भरा आणि सेंड हे बटन प्रेस करा.
  8. ट्रान्झेशन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आपला UPI PIN टाका.
  9. अशा पद्धतीने आपण इंटरनेट विना युपीआय पेमेंट पूर्ण करु शकता.
कार्डद्वारे ऑनलाईन पेमेंट पद्धतीत बदल

भारतीय रिझर्व्ह बँकेने टोकनायझेशनसाठी नवीन नियम जारी केले आहेत. नवीन नियमांतर्गत डेबिट कार्डद्वारे पेमेंट करण्याच्या पद्धतींमध्ये बदल होणार आहेत. RBI कार्ड जारी करणाऱ्यांना पेमेंट अॅग्रीगेटर आणि व्यापाऱ्यांसह कार्ड टोकनाईझ करण्याची परवानगी देते. त्याचबरोबर नवीन नियमांमध्ये प्रायव्हसीकडेही लक्ष देण्यात आले आहे. तुमच्या कार्डचा नंबर तुम्ही शेअर न करताही पेमेंट करता येणार आहे. टोकनायजेशनमध्ये तुम्हाला तुमचे कार्ड डिटेल टाकण्याची गरज नाही. त्याऐवजी टोकन नावाचा एक पर्यायी क्रमांक मिळणार आहे, जो तुमच्या कार्डाशी लिंक असेल. ज्याचा वापर करून तुमच्या कार्ड तपशील तुम्ही सुरक्षित ठेवू शकता आणि पेमेंट करू शकता.

Previous articleJee Main Result 2021 । जेईई मेन चौथ्या सत्राचा निकाल, कटऑफसह ऑल इंडिया रँक जाहीर होणार
Next articleMan on Mars Mission | निजी कंपनी स्पेसएक्स 2026 में मंगल ग्रह पर उतारेगी पहले इंसान को, ऐसी है पूरे मिशन की रूपरेखा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).