Home Education JEE Main Result। जेईई मेनचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा एकमेव अथर्व अभिजीत तांबट...

JEE Main Result। जेईई मेनचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा एकमेव अथर्व अभिजीत तांबट टॉपमध्ये, नंबर 1 रँकवर 18 जण

616

मुंबई ब्युरो : जेईई मेन 2021 सेशन्स 4 चा निकाल मंगळवारी रात्री उशिरा घोषीत करण्यात आलाय. यात रेकॉर्डब्रेक अशा 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क मिळवलेत. तर नंबर 1 रँकवर 18 जण आहेत. विशेष म्हणजे यावर्षी 7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या 18 जणांनी रँक 1 मिळवलीय त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. आंध्राचे सर्वाधिक 4 तर त्यापाठोपाठ राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी 2 विद्यार्थी टॉप 18 मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे.

जेईई मेन 2021 सेशन 4 च्या परीक्षा 2 सप्टेंबरला संपल्या होत्या. फायनल अन्सर की वर आक्षेप घेण्यासाठी 8 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती. त्यानंतर फायनल अन्सर की जारी करण्यात आली. तेव्हापासूनच जेईई मेन्सचा निकाल jeemain.nta.ac.in वर अपेक्षीत होता. गेल्या वर्षी 24 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले होते.

JEE Main Result 2021 असा चेक करा

  • स्टेप 1- सर्वात आधी तुम्ही अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic वर जा
  • स्टेप 2- जेईई मेन 2021 च्या सेशन 4 च्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
  • स्टेप 3- आता परीक्षेचं सेशन, अर्ज संख्या, जन्म तारीख नोंद करा
  • स्टेप 4- JEE मेन 2021 च्या निकालाची कॉपी डाऊनलोड करा.
Previous articleAmravati News । वर्धा नदीत नाव उलटून 11 जण बुडाले, प्रशासनामार्फत युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरु
Next articleInvestment | म्यूचुअल फंड लेने से पहले कितना टैक्स चुकाना पड़ता है?, निवेश के रिटर्न का ऐसे कीजिए हिसाब
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).