Home मराठी सावनेर येथे भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख...

सावनेर येथे भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती

725

समर्थ बूथ अभियान, युवा वॉरियर्स शाखेचे उद्घाटन

सावनेर : भाजप चे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सावनेर विधानसभा क्षेत्रात समर्थ बूथ अभियान – युवा वॉरियर्स शाखेचे उद्घाटन खापरखेड़ा व खापा येथे संपन्न झाले.

यावेळी सावनेर येथे भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्ते, पदाधिकार्यांसोबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा केली. आपल्या संबोधनात त्यांनी भविष्यातील नियोजन, जवाबदाऱ्यांबद्दल मंथन केले.

यावेळी अरविंदजी गजभिये – भाजपा जि.अ नागपूर ग्रामीण, किशोरजी रेवतकर – भाजपा स.म . नागपूर ग्रामीण, आदर्शजी पटले – जि.अ. भाजयुमो, संकेत बावनकुळे – भाजयुमो प्र. का. सदस्य, सर्व महामंत्री इमेश्वरजी यावलकर , कपिलजी गायधने, अंजलीताई कानफाडे . खापा न. अ . प्रियांकाताई मोहाटे, उ .अ. देवाजी बोरकर, जि.अ. ओबीसी मोर्चा – प्रकाशजी टेकाडे, महिला आघाडी अध्यक्ष संध्याताई गौतमारे, ज्येष्ठ नेते सोनबाजी मुसळे, भाजपा शहर नगराध्यक्ष मंदारजी मंगळे आणि सर्व कार्यकर्ते, युवा वॉरिअर, पदाधिकारी उपस्थित होते.