Home मराठी Nagpur । डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे बालकांसाठी गायन स्पर्धा, गाणं पाठविण्याचे आवाहन

Nagpur । डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे बालकांसाठी गायन स्पर्धा, गाणं पाठविण्याचे आवाहन

नागपूर ब्युरो : नागपूरच्या नामांकित  डॉ. दंदे फाऊंडेशनच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी 6 ते 12 वर्ष वयोगटासाठी गायन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक स्पर्धकांना कोणत्याही भाषेतील गाण्याचे एक कडवे गाऊन त्याचा व्हिडीयो 8767929607 या क्रमांकावर व्हॉट्सएप करायचा आहे.
तीन विजेत्यांना रोख पारितोषिक, सर्वांना प्रमाणपत्र

गाताना रेकॉर्डेड ट्रॅक किंवा वाद्यांचा वापर करता येणार नाही. माईकचा वापर केला तर चालणार आहे, असे आयोजकांनी कळविले आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 2000, 1500 व 1000 रुपयांचे रोख पारितोषिक तसेच प्रमाणपत्र देण्यात येईल. याशिवाय तीन प्रोत्साहनपर पुरस्कारही असणार आहेत. प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

गाण्याला विषयाचे बंधन नाही

गाणं सुरू करण्यापूर्वी नाव, वय, भाषा आणि शहराचे नाव यांचा उल्लेख अनिवार्य आहे. व्हिडीयो व्हॉट्सएप करताना पीनकोडसह संपूर्ण पत्ता पाठवायचा आहे. गाण्याला विषयाचे बंधन नाही. व्हिडीयो आडव्या स्क्रीनवर रेकॉर्ड केलेला असावा, अशी अट आयोजकांनी घातलेली आहे. स्पर्धेचा निकाल आगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे घोषित करण्यात येईल.

संगीत क्षेत्रातील मंडळी करणार स्पर्धेचे परीक्षण 

श्रेया खराबे, नुपूर देशपांडे, सारंग लाडसे, अनुराग लाडसे व नहुश बडगे ही संगीत क्षेत्रातील मंडळी स्पर्धेचे परीक्षण करणार आहे. 10 आगस्टला दुपारी 12 पर्यंत येणारे व्हिडीयो स्पर्धेसाठी पात्र ठरविले जातील. स्पर्धेसाठी 100 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे.