Home Maharashtra Protest । महागाई विरोधात मध्य नागपूर युवक कॉंग्रेसची सायकल रॅली

Protest । महागाई विरोधात मध्य नागपूर युवक कॉंग्रेसची सायकल रॅली

-वाढत्या पेट्रोल, डिजलच्या दरांविरुद्ध आंदोलन

नागपूर ब्युरो : वाढत्या महागाईमुळे एकीकडे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार तसेच महाराष्ट्रातील भाजपचे नेते राजकारण करण्यात व्यस्त आहेत. याविरोधात मध्य नागपूर युवक कॉंग्रेसतर्फे शहरात सायकल रॅलीचे आय़ोजन करण्यात आले.

इंडिया युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांच्या कार्यालयापासून सुरु झालेल्या रॅलीने मध्य नागपूर पिंजून काढत “आता तरी बोला, अन्यथा उपाशी मराल” असे सांगत नागरिकांना महागाई विरोधात बोलण्याचे आवाहन केले. रॅलीने महाल संघ मुख्यालय बडकस चोक गाठताच चौकात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुखवटा लावलेल्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याने केक कापून फडणवीसांचा वाढदिवसही साजरा केला. तसेच राज्यसरकार विरोधात बोलणारे फ़डणवीस केंद्र सरकारच्या महागाई विरोधात बोलतील का असा टोलाही यावेळी कार्यकर्त्यांनी लगावला.

इंडिया युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके व नागपूर युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष तौसीफ खान यांच्या मार्गदर्शनात व नागपूर शहर युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आकाश गुजर, नागपूर शहर युवक कॉंग्रेसचे महासचिव नयन लालाजी तरवटकर, मध्य नागपूर अध्यक्ष स्वप्नील ढोके यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी सायकल रॅलीमध्ये भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here