Home Maharashtra फैजान मिर्झा यांचा टोला । भाजपने काश्मीरच्या “राजकीय लव्ह जिहाद” वर सुद्धा...

फैजान मिर्झा यांचा टोला । भाजपने काश्मीरच्या “राजकीय लव्ह जिहाद” वर सुद्धा आत्मचिंतन करावे

नागपूर ब्युरो : रायुकां प्रदेश कार्यकारिणी सदस्य फैजान मिर्जा यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका करतांना म्हटले आहे कि भाजपने काश्मीरच्या “राजकीय लव्ह जिहाद” वर सुद्धा आत्मचिंतन करावे. भाजप नेत्यांकडून उठ सुठ महाविकास आघाडी वर टीका केली जात आहे. यामुळे फैजान मिर्झा यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे.


मिर्झा यांचे म्हणणे आहे कि अगोदर भाजप च्या नेत्यांनी एकदा स्वतःचे आत्मचिंतन करा=ने देखील गरजेचे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीच्या सोबत युती करून सत्ता स्थापन केलेली आहे. त्या सत्तेला “राजकीय लव जिहाद” असं म्हणाच काय? असा बोचरा सवाल देखील मिर्झाला यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे. महाराष्ट्रात महा विकास आघाडी महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी बनलेली आहे, राजकीय हितासाठी नाही, असेही मिर्झा म्हणाले.

मिर्झा यांनी म्हटले आहे कि सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी वर टिप्पणी करण्याअगोदर जरा स्वतःच्या पक्षाला समझ देण्याची कृपा करावी. त्यांनी भाजपच्या नेत्यांना अशी एक विनंती केली आहे कि कृपया आपण महाराष्ट्र हितासाठी महाविकास आघाडीच्या विकास कामात अडथळा आणू नये. कृपया जीएसटी परताव्यासाठी आणि नवीन योजना राबविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारची मदत करायला सांगाव, हाच त्यांचा खरा महाराष्ट्र प्रेम असेल.