नागपूर ब्युरो : आयपीएस अधिकारी विनीता साहू यांची नागपूर शहर पोलिस दलात अपर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची राज्य राखीव पोलिस दलात (एसआरपीएफ) उपमहानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी झालेल्या प्रशासकीय फेरबदलात त्यांना पुन्हा शहर पोलिस दलात पाठविण्यात आले.
यापूर्वी त्यांनी नागपूर शहर पोलिसांमध्ये झोन-दोनच्या पोलिस उपायुक्त (डीसीपी) म्हणून काम पाहिले असून, त्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेता ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.




















