नागपूर ब्युरो: महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने तब्बल 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. विशेष म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिन हा राज्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या पोलीस खात्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून सातत्याने आयएएस आणि आयपीएस स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. याआधीदेखील राज्याच्या गृह खात्याने अनेक IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसेच प्रशासनातील अनेक IAS अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. यावेळी करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये मुंबईपासून ते ठाणे, धुळे, अमरावती,नाशिक, चंद्रपूर, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी अशा विविध जिल्ह्यांतील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कुणाची कुठे बदली करण्यात आली?
जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अजय के. बन्सल यांची पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमरातीचे पोलीस अधीक्षक सिंगुरी विशाल आनंद यांची धुळे पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबई शहर पोलीस अपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची पोलीस महासंचालय कार्यालय येथे सहायक पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

फोर्स वनचे पोलीस अधीक्षक गजानन राजमाने यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह एस. परदेशी यांची मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात उप आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त संदीप घुगे यांची मुंबई शहरच्या पोलीस उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक धोडोंपत एस. स्वामी यांची नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज मिलिंद तारे यांची पुणे येथे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) आणि सहायक पोलीस महानिरीक्षक आस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 निकेतन कदम यांची अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची मुंबई शहर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची नंदुरबार पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधु यांची जालनाच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.




















