मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या शुभेच्छा
नागपूर ब्युरो : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी पदाची सूत्रे मावळते जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून स्वीकारली. यावेळी डॉ. इटनकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभाग प्रमुखांची बैठक बोलावून प्रत्येक विभागाचे कामकाज व त्या-त्या विभागांकडे असलेल्या महत्वाच्या योजना व विषयांबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे यापूर्वी सोलापूर येथे जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होते. गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी कोरोना काळात प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या फुलोरा उपक्रमाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सोलापूर येथे त्यांनी पारदर्शी प्रशासनाला अधिक चालना दिली.





















