Home मराठी रवी राणा-बच्चू कडू वादावर नवनीत राणांनी बोलणे टाळले

रवी राणा-बच्चू कडू वादावर नवनीत राणांनी बोलणे टाळले

419

नागपूर ब्यूरो: अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यात गेले आठ दिवस खोक्यांवरून सुरू असलेल्या वादाचे खापर बच्चू कडू शेवटी मीडियावर फोडून मोकळे झाले असतानाच आमदार रवि राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी मात्र या वादावर उघडपणे बोलणे टाळले आहे. मुंबईला जाण्यासाठी नागपूर विमानतळावर आल्या असता मीडियाने त्यांना गाठले असता या वादावर स्पष्टपणे काही बोलणे टाळले.

रवि राणा आणि बच्चू कडू हे दोघेही माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत. माझ्यापेक्षा जास्त त्यांना कळते. असे म्हणत रवी राणा-बच्चू कडू वादावर बोलणे त्यांनी टाळले. मी माझ्या कामावर लक्ष देते. कारण माझी कामे माझ्यासाठी अधिक महत्वाची आहेत.

मुंबईला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जात आहात का, असे विचारले असता, मुंबई मझे घर आहे. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. ते जे सांगतात, ते आम्ही करतो, असे खासदार राणा म्हणाल्या.

रवी राणा आणि बच्चू कडू या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घमासान सुरू आहे. पण त्या वादाशी माझा संबंध नाही. मी घरी रवीजींची पत्नी आहे, अन् बाहेर लोकसेवक आहे, असे नवनीत राणा यांनी सांगितले.