Home मराठी ऊर्जामंत्री नितीन राऊत । वीज प्रकल्पांकडे 2 दिवसांपुरताच कोळसा, कामगार संघटनांसोबत बैठकही...

ऊर्जामंत्री नितीन राऊत । वीज प्रकल्पांकडे 2 दिवसांपुरताच कोळसा, कामगार संघटनांसोबत बैठकही रद्द

वीजनिर्मिती प्रकल्पांकडे दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. दरम्यान, वीज कर्मचारी संघटनांच्या संपाचा आज पहिलाच दिवस होता. उद्या मंगळवार, २९ रोजी ऊर्जामंत्र्यांसोबत सर्व संपकरी संघटनांची बैठक होणार होती, ती रद्द झाली. पहिल्या दिवशी राज्यात पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यात आल्याचा दावा महावितरणच्या सूत्रांनी केला.

वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. कर्मचारी प्रतिनिधींशी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे चर्चा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना नितीन राऊत यांनी राज्यात दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध असल्याचे सांगितले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या संपाचा सोमवारी पहिल्या दिवशी वीजपुरवठ्यावर परिणाम झाला नसल्याचा दावा महावितरणने केला आहे. सोमवारी राज्यात दुपारी ३.३० वाजता २३,१३० मेगावॅट इतकी मागणी होती. तेवढा पुरवठा करण्यात आला. सोमवारी राज्यात बँक व एलआयसी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने विजेची मागणी कमी होती.