Home मराठी मुंडले इंग्लिश माध्यम शाळेत स्वातंत्रदिन-अमृत महोत्सवी वर्ष उत्साहाने साजरा

मुंडले इंग्लिश माध्यम शाळेत स्वातंत्रदिन-अमृत महोत्सवी वर्ष उत्साहाने साजरा

652

नागपूर ब्यूरो: दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशन नागपूर मुंडले इंग्लिश मिडियम शाळेत १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिन हा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी पर्व म्हणून अतिशय उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.सद्य परिस्थितीचा विचार घेऊन सामाजिक आंतर पाळून निवडक लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे Tokyo Olympics 2020 येथे टेबल टेनिस या खेळासाठी पंच म्हणून ज्यांनी काम पाहिले, असे मंगेश मोपकर सर हे लाभले होते. सर्वप्रथम झेंडा फडकवून ध्वजाला मानवंदना देण्यात आली. नंतर मराठी-सान्वी नन्दृनकर, इंग्रजी-आरव कत्राणी, संस्कृत-आदीत्री ठवरे व संस्कृत-प्राणदा चांद्रायण यांनी प्रसंगाचे औचित्य साधून उत्तमरीत्या भाषणे सादर केली. यानंतर शाळेचे विद्यार्थी श्रीपाद कानीटकर व स्वरा लष्करे यांनी योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. नंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सुश्राव्य असे गीत सादर करून देशप्रेमाची जागृती केली.कार्यक्रमाचे संचालन शाळेची विद्यार्थिनी चारुल दुबे हीने केले.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली. नंतर मोपकर सरांनी शिक्षकांना त्यांचे पंच या भूमिकेतील अनुभव सांगून चर्चा केली. कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे, व्यवस्थापन कमिटी सचिव नागेशजी कानगे, सहाय्यक सचिव गजानन रानडे व इतर सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. रुपाली हिंगवे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मेघा पाध्ये, सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.