Home मराठी Nagpur । विद्युत कारणाने लागणाऱ्या आगीच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी कार्यशाळा

Nagpur । विद्युत कारणाने लागणाऱ्या आगीच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी कार्यशाळा

नागपूर ब्युरो : विद्युत कारणाने आगी लागण्याच्या घटना चा अभ्यास करण्यास मनपा अग्निशमन विभाद्वारे शनिवार, दिनांक 5 रोजी पंजाबराव देशमुख सभागृहात एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

राष्ट्रीय अग्नीशमन सेवा महाविद्यालय मधील सहायक प्राध्यापक श्रीमती नेहा तिवारी अग्रवाल यांनी “Approach of Investigation to conclude Electrical Fire Accident” या विषयावर व्याख्यान देऊन मनपा अग्नीशमन अधिकाऱ्याना कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत मनपा चे मुख्य अग्नीशमन अधिकारी राजेंद्र उचके, अग्नीशमन केंद्र अधिकारी मोहन गुडधे ,राजेंद्र दुबे, तुषार बाराहाते, अनिल गोळे, सुनिल ङोकरे, भगवान वाघ, अनिल बर्डे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here