Home Education MPSC Exam । मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली, परीक्षेची तारीख बदलणार?

MPSC Exam । मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली, परीक्षेची तारीख बदलणार?

मुंबई ब्युरो : एमपीएससी परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत ही बैठक पार पडणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत परीक्षेबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्याच परीक्षार्थींचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी म्हणजेच 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. परंतु या परीक्षेवर अनिश्चिततेचं सावट आहे. मात्र परीक्षेबाबत सरकारकडून एमपीएससी प्रशासनाला कोणतीही सूचना मिळालेली नाही. त्यातच राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावले असून शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन आहे. त्यामुळे परीक्षा 11 एप्रिलला होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत चर्चा केली. दरम्यान याबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्याचं कळतं.

दरम्यान मागील महिन्यातच एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलल्याचं चित्र आहे. कोरोना संसर्गामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Previous articleMaharashtra । निवडणुका असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला : मनसे
Next articleयुवक काँग्रेसची राज्यव्यापी रक्तदान शिबीरे; २५ हजार रक्तपिशव्यांचा निर्धार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).