Home Banking Bank Holidays । खोळंबा टाळण्यासाठी सुट्ट्या बघून करा कामाचं नियोजन

Bank Holidays । खोळंबा टाळण्यासाठी सुट्ट्या बघून करा कामाचं नियोजन

मुंबई ब्युरो : मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या सुरुवातीला पाच दिवस बँका बंद होत्या त्यामुळं नागरिकांना अनेक आर्थिक व्यवहार पुढं ढकलावे लागले किंवा रद्द करावे लागले. आता एप्रिल महिन्यात 6 एप्रिल ते 25 एप्रिल या काळात विविध सण आणि साप्ताहिक सुट्टी यामुळं साधारण सात दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं नागरिकांनी या सुट्ट्यांचे वेळापत्रक बघून आपल्या कामाचे नियोजन केल्यास त्यांची कामे वेळेत पूर्ण होतील.

27 मार्च ते चार एप्रिल या कालावधीत 30 मार्च आणि 3 एप्रिल हे दोन दिवस वगळता देशभरातील बँका आर्थिक वर्ष समाप्ती आणि सुट्ट्या यामुळं जवळपास पाच दिवस बंद होत्या. आता एप्रिलमध्येही बँकांना भरपूर सुट्ट्या मिळणार आहेत. यामध्ये काही सुट्ट्या विधानसभा निवडणूक आणि प्रादेशिक सण यामुळे त्या त्या राज्यांपुरत्याच मर्यादित आहेत, तर एकाच दिवशी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सणांच्या सुट्ट्या आहेत.

उदाहरणार्थ, तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीमुळे त्याठिकाणी 6 एप्रिल रोजी सुट्टी असल्यानं तिथल्या सर्व खासगी आणि सार्वजनिक बँका बंद होत्या. उर्वरीत देशभरात सर्व बँकांचे कामकाज 6 एप्रिल रोजी नियमितपणे सुरू होते. विशिष्ट दिवस सुट्टी म्हणून घोषित करण्याचा निर्णय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्ट, हॉलिडे अंडर निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट्स अ‍ॅक्ट अँड रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बॅंकांचे खाते बंद करण्याचे काम या तीन बाबींचा विचार करून घेण्यात येतो. त्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. ती खालीलप्रमाणे आहे.

आरबीआय ने जाहीर केलेली एप्रिल मधील सुट्ट्यांची यादी :
  1. 6 एप्रिल: विधानसभेच्या निवडणुकीमुळे ठराविक राज्यात विशिष्ट सुट्टी; इतर राज्यांमधील बँका सुरू
  2. 10 एप्रिल: महिन्याचा दुसरा शनिवार असल्यानं सर्व बँका बंद राहतील.
  3. 11 एप्रिल : रविवार
  4. 13 एप्रिल: गुढी पाडवा, तेलगू नववर्षाचा दिवस, उगाडी उत्सव, सजीबु नोंगमपणबा (चेराओबा), पहिले नवरात्र, वैशाखी (बैसाखी)
  5. 14 एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, तामिळ नववर्षाचा दिवस, विशु, बिजू महोत्सव, चैराबा (मणिपूर), बोहाग बिहू (आसाम, अरुणाचल प्रदेश)
  6. (हे वाचा-SBI चा कोट्यवधी ग्राहकांना झटका! घर खरेदी झाली महाग, वाचा किती वाढला तुमचा EMI)
  7. 15 एप्रिल: हिमाचल दिन, बंगाली नवीन वर्षाचा दिवस, बोहाग बिहू, सरहुल
  8. 21 एप्रिल: श्री राम नवमी, गारिया पूजा, पश्चिम बंगाल, आसाम, गोवा, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, पुद्दुचेरी, तामिळनाडू इथं ही राष्ट्रीय सुट्टी असेल.
  9. 24 एप्रिल: महिन्याचा चौथा शनिवार असल्यानं बँका बंद राहतील.
  10. 25 एप्रिल: महर्षी पशुराम जयंतीनिमित्त हिमाचल प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थानमध्ये ही सुट्टी असेल.
Previous articleJustice Ramana | जस्टिस एनवी रमण होंगे देश के अगले चीफ जस्टिस , 24 अप्रैल को संभालेंगे पद
Next articleBig News । व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर दुकानांबाबतच्या निर्बंधांवर राज्य सरकारने केला खुलासा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).