Home Health Nagpur । क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास खाजगी डॉक्टरांवर दाखल होणार गुन्हा

Nagpur । क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास खाजगी डॉक्टरांवर दाखल होणार गुन्हा

670
नागपूर ब्युरो : कोणत्याही खाजगी रुग्णालयात उपचारास येणाऱ्या क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले असून माहिती न देणाऱ्या खाजगी डॉक्टर्सवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ममता सोनसरे यांनी दिली.

आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या अधिसूचनेनूसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद होऊन त्यांच्यावर उपचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. क्षयरोगाचा प्रसार रोखणे व नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून निदान झालेल्या प्रत्येक रुग्णांची आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थांनी क्षयरोग निदान करणाऱ्या राज्यातील सर्व पॅथालाजी, मायक्रोबायोलॉजी, प्रयोगशाळा रिव्हर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करावी लागणार आहे.

ज्या खाजगी प्रयोगशाळा, डॉक्टर, रुग्णालय, औषधी विक्रेते यांनी निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंदणी न केल्याचे दिसून आल्यास अशा संस्था व व्यक्तीविरुध्द क्षयरोग प्रसारास मदत भांदवि (45/1860) अन्वये कलम 269 व 270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दोषी ठरलेल्या व्यक्तीस सहा महिने ते दोन वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे.

1 जानेवारीपासून अंमल

क्षयरोग निदान व उपचारासंबंधी नव्या कायद्याची कडक अंमलबजावणी 1 जानेवारीपासून सुरु झाली आहे. त्यामुळे क्षयरोग निदान करणाऱ्या सर्व पॅथालाजी, मायक्रोबायोलॉजी, प्रयोगशाळा, रेडीओलॉजी, डॉक्टर व औषधी विक्रेत्यांना क्षयरोग विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. नव्याने आढळणारे रुग्ण व औषधी घेण्याची माहिती संबंधितांनी जवळचे आरोग्य केंद्र किंवा क्षयरोग कार्यालयास कळविणे बंधनकारक आहे, असे डॉ. दीपक सेलोकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

यास्तव खाजगी व्यावसायिक व रुग्णालये, औषध विक्रेते, रेडिओलॉजिस्ट व पॅथोलॉजिस्ट यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपणाकडे नवीन निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती तात्काळ क्षयरोग पर्यवेक्षक व जिल्हा पीपीपएम समन्वयक यांच्या ईमेलवर प्रतीमहा कळविण्यात यावी, अधिक माहितीसाठी 1800116666 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Previous articleआयएमए ने मागितले स्पष्टीकरण | कोरोनिल औषधा संदर्भातील बाबा रामदेव यांचा दावा खोटा
Next articleNagpur | खाण उद्योगात होत असलेला बदल आणि उद्योजकांसाठी संधी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).