Home Maharashtra लातूरमधील एकाच वसतीगृहात 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

लातूरमधील एकाच वसतीगृहात 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

261
0
लातूर ब्युरो : राज्यावर कोरोनाचे संकट पुन्हा एकदा ओढावले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर लातूर शहरात एकाच वसतीगृहात 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

लातूरमधील एमआयडीसी परिसरातील जेएसपीएम संस्थेच्या वसतीगृहात हा प्रकार घडला आहे. वसतीगृहातील 40 विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

लातूर महापालिकेने 420 विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. या तपासणीचे रिपोर्ट आता समोर आले असून 40 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना 12 नं. पाटी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here