Home Health Yavatmal । पोलिओ लसीकरणादरम्यान 12 बालकांना सॅनिटायझर पाजलं

Yavatmal । पोलिओ लसीकरणादरम्यान 12 बालकांना सॅनिटायझर पाजलं

469
0

यवतमाळ ब्युरो : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला 31 जानेवारीपासून देशभर सुरुवात झाली. मात्र पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कायदायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान लहान मुलांना सॅनिटीझर पाजण्यात आलं आहे. 1 ते 5 वयोगटातील ही मुले आहेत .

सॅनिटायझर पाजलेल्या 12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. सुरुवातीला मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यांनंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. या संपूर्ण घटनेची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करत आहेत.

मुलांना लस म्हणून सॅनिटीझर पाजण्यात आले हे केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी काही वेळाने त्या सर्वांना पोलिओ लस दिली. घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली गेली नव्हती, असं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले. संपूर्ण प्रकार गंभीर असून यात कोणाकडून ही चूक झाली याची चौकशी सुरू आहे. ज्यावेळी मुलांना लस देण्यात आली त्यावेळी लसीकरण केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका हे तिघे जण हजार होते. तिघांपैकी कुणाकडून ही चूक झाली याचा तपास जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी करत आहेत.

Previous articleNagpur । कथित विदेशी तरुणीशी फेसबूक फ्रेंडशिप वृद्धाला पडली महाग
Next articleMaharashtra । पोलिओ लसीकरणादरम्यान प्लॉस्टिकचा तुकडा गेला बाळाच्या पोटात
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here