Home हिंदी Maha Metro। व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांचा सायकलसह मेट्रो ने प्रवास

Maha Metro। व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांचा सायकलसह मेट्रो ने प्रवास

नागपूर ब्यूरो : महा मेट्रो तर्फे प्रवाश्याकरिता विविध सोई सुविधा मल्टी मॉडेल इंट्रिग्रेशन अंतर्गत उपलब्ध करण्यात येत असून मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा महा मेट्रोने सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे.


या अनुषंगाने आज सकाळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी स्वतः सायकल ने मेट्रो स्टेशनची पाहणी केली. शंकर नगर चौक तसेच रचना जंक्शन मेट्रो स्टेशनची नुकतेच सीएमआरएस तर्फे पाहणी करण्यात आली असून सदर मेट्रो स्टेशन लवकरच नागरिकांकरिता खुले होण्याच्या मार्गावर आहे याच अनुषंगाने महा मेट्रोचे व्यवस्थापकीय डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज शंकर नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली व स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सोई – सुविधाच आढावा घेत, समाधान व्यक्त करत केलेल्या कार्याची प्रशंसा केली.


या व्यतिरिक्त डॉ. दीक्षित यांनी सिताबर्डी इंटरचेंज (ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिका), खापरी मेट्रो स्टेशन, मिहान डेपोची सायकलने प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी डॉ. दीक्षित म्हणाले कि, नागरिकाकरिता अतिशय उपयुक्त व सोईस्कर सेवा उपलब्ध करण्यात आली असून नागपूरकरांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आपल्या दैनंदिन प्रवासात सायकल वीथ मेट्रो किंवा मेट्रो सेवा सोबत फिडर सेवेचा उपयोग करून पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी नागपूरकरांना तसेच मेट्रो कर्मचार्यांना केले. यावेळी कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक सुधाकर उराडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर 15 मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात सायकलिस्ट असून जे दररोज सायकल ने प्रवास करून कॉलेज, ऑफिस तसेच इतर ठिकाणी ये जा करतात. सायकल मेट्रो मध्ये सोबत नेणे सोईस्कर झाले आहे. महा मेट्रो या अनोख्या प्रवास करता प्रवाश्याना आवाहन करते कि मेट्रो प्रवासी आता कुठल्याही ठिकाणी जाण्याकरिता सहज पणे मेट्रो मध्ये सायकल सोबत बाळगून प्रवास करू शकतात. त्यामुळे आता मेट्रो सोबत सायकल अशी पर्यावरणपूरक प्रवासी सेवा नागरिकांच्या फायद्याची ठरणार आहे. मेट्रो कोच येथे सायकलिस्ट करता योग्य सूचना फलक तसेच सायकल ठेवण्याकरिता योग्य जागा नेमली आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here