Home हिंदी Nagpur | कोराडी येथील जगदंबेचे मंदिर भाविकांसाठी खुले

Nagpur | कोराडी येथील जगदंबेचे मंदिर भाविकांसाठी खुले

803

नागपूर ब्यूरो : राज्य शासनाच्या आदेशानंतरच श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी च्या वतीने सोमवारी महालक्ष्मीचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले .दुपारी साडे अकराच्या सुमारास संस्थांचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिराचे गाभार्‍याचे मुख्य द्वार भाविकांसाठी खुले करण्यात आले.

त्यानंतर भाविकांनी मातेच्या दर्शनाचा आनंद घेतला . यावेळी महादुला नगर पंचायत अध्यक्ष राजेश रंगारी, माजी सरपंच विठ्ठल निमोने भाजपाचे किशोर बरडे, संस्थांचे सचिव दत्ता समरीतकर ,विश्वस्त प्रेमलाल पटेल, केशव महाराज, रामदास महाराज फुलझेले, राजू महाराज, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेता अनिल निधान ,किशोर बेले, प्रीतम लोहासारवा, रवी पारधी ,प्रभा निमोने, लक्ष्मीकांत तळसकर, पंकज चौधरी ,गणेश राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

भाविकांनी मातेचे दर्शन घेताना शासनाच्या पूर्ण संदर्भातील सर्व नियमावलीचे पालन करावे असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आलेले आहे .संस्थानच्यावतीने शनिटायझर व सामाजिक अंतर राहील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. वयोवृद्ध नागरिकांनी मातेच्या दर्शनासाठी येण्याचे टाळावे असेही संस्थेने आवाहन केले आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).