Home मराठी Nagpur | शिकवण्यापलीकडचा आदर्श निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा गौरव

Nagpur | शिकवण्यापलीकडचा आदर्श निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा गौरव

388

विदर्भ गौरव प्रतिष्ठानचा पुढाकार, महापालिकेच्या सात शिक्षकांचा शिक्षक दिनी गौरवआदर्श

नागपूर ब्यूरो : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत अशी पिढी घडविण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल महानगरपालिकेच्या सात शिक्षकांचा विदर्भ गौरव प्रतिष्ठान तर्फे आज सत्कार करण्यात आला.

शिक्षक दिनानिमित्त विदर्भ गौरव प्रतिष्ठान तर्फे आयोजित या उपक्रमात शिक्षक आमदार ना गो गाणार यांनी शिक्षकांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. हनुमान नगर येथील लालबहादूर शास्त्री महानगरपालिकेच्या हिंदी उच्च प्राथमिक शाळेत आयोजित या कार्यक्रमास माजी शिक्षण सभापती दिलीप दिवे शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार राजेंद्र पुसेकर विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या सौ प्रगती पाटील व्यासपीठावर उपस्थित होत्या.

समाजातील अत्यंत वंचित अशा मुलांसाठी महानगरपालिकेतर्फे शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगताना आमदार श्री गाणार महणाले कीअशा विद्यार्थ्यांना शिकविण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षक करतात, विद्यार्थ्यांना शिकविण्यासोबतच त्यांच्यामध्ये विविध कलांचा विकास तसेच विज्ञान प्रेमी पिढी घडविण्याचे काम होत असून यामध्ये शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

इतर खाजगी शाळांसोबत आपली शाळा सुद्धा प्रगत व्हावी हा शिक्षकांचा उद्देश असतो त्यामुळे अशा शाळांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्या साठी पुढाकार आवश्यक आहे.असेही ते म्हणाले. विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या प्रकल्प प्रमुख माजी नगरसेविका सौ प्रगती पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसोबतच महानगरपालिकेतील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा गौरव प्रतिष्ठान तर्फे करण्याचा निर्णय घेतला यावर्षी शिक्षणा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या विज्ञान शिक्षिका श्रीमती दीप्ती बीस्ट सौनिता गडेकर ज्योती मेडपिलवार नीलिमा आढाव पुष्पलता गावंडे मनीषा मोगलेवार माधुरी पडवळ या या शिक्षण या शिक्षकांची निवड करण्यात येऊन शिक्षक दिनी त्यांचा गौरव करण्यात येत आहे.

यावेळी महापालिकेच्या माजी शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीती मिस्त्रीकोटकर यांचाही प्रतिष्ठान तर्फे गौरव करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त गौरविण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये नॅशनल सायन्स टीचर काँग्रेस मध्ये भाग घेऊन राष्ट्रीय स्तरावर विविध शोधनिबंध सादर केले आहेत तसेच अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून शहरातील विद्यार्थी शाळातील विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेतील विज्ञानाचे प्रयोग तयार करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी(जिल्हा परिषद) सौ रोहिणी कुंभार, यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला श्रीमती माधुरी पडळकर नीलिमा अधाऊ जोती मेडपिलवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन सौ मधु पराड यांनी तर आभार लता कनाटे यांनी मानले यावेळी लाल बहादूर शास्त्री हिंदी उच्च मध्यामिक शाळेचे मुख्याध्यापक संजय पुंड तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.