Home मराठी Ganeshotsav | ‘व्‍हीआयपीएलचा राजा’ची 31 रोजी प्रतिष्‍ठापना

Ganeshotsav | ‘व्‍हीआयपीएलचा राजा’ची 31 रोजी प्रतिष्‍ठापना

437

दहा दिवस विविध दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर ब्युरो : विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने यंदापासून गणेशोत्सवाचे आयोजन करण्‍यात आले असून त्‍याअंतर्गत गायत्रीनगर येथील व्हीआयपीएल आयटी पार्कच्या आवारात “व्हीआयपीएलचा राजा” ची प्रतिष्ठापना होणार आहे. त्‍याअनुषंगाने 31 ऑगस्‍ट ते 9 सप्‍टेंबर दरम्‍यान विविध दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

बुधवार, 31 ऑगस्‍ट रोजी गणेश चतुर्थीला श्रीगणेशजींच्या स्‍थापनेने या उत्‍सवाला प्रारंभ होईल. गुरुवार, 1 सप्‍टेंबर रोजी 4 वाजता वारकरी भजन आयोजित करण्‍यात आले असून 2 सप्‍टेंबरला सायंकाळी 7.30 वाजता ‘हसते रहो कॉमेडी शो’ होणार आहे. यात राजकुमार रँचो, राहूल इंगळे व अहसान कुरेशी यांचा सहभाग राहील. शनिवारी, 3 तारखेला सायंकाळी 7.30 वाजता इंडियन आयडॉल फेम शन्‍मुख प्रिया यांची ‘लाईव्‍ह कॉन्‍सर्ट’ होणार आहे तर 4 तारखेला रविवारी दुपारी 5 वाजता ‘जो ज‍िता वही सिकंदर’ या ‘व्‍हीआयपीएलच्या कर्मचा-यांच्‍या अंतर्गत स्‍पर्धेची पहिली फेरी होईल. या स्‍पर्धेची अंतिम फेरी 5 तारखेला सायंकाळी 7.30 वाजता आयोज‍ित करण्‍यात आली आहे.

मंगळवार, 6 सप्‍टेंबर सायंकाळी 7.30 वाजता ‘पंचम भावगीत संध्‍या’ हा संगीतमय कार्यक्रम सचिन व सुरभी ढोमणे सादर करणार आहेत. 7 तारखेला सायंकाळी 7.30 वाजता भजन संध्‍या व महाआरतीचे आयोजन करण्‍यात आले आहे. 8 तारखेला सकाळी 11.30 वाजता कथा हा ‘व्‍हाईस ऑफ नागपूर’ चा कार्यक्रम होणार असून हा सर्वांसाठी खुला आहे. 9 तारखेला दुपारी 1 वाजता महाप्रसाद व सायंकाळी 6 वाजता गणेश विसर्जन होणार आहे.

गणेशोत्‍सवात दररोज सकाळी 11 व सायंकाळी 7 वाजता आरती होणार आहे. गणेशोत्‍सवात विविध कार्यक्रमांचा आस्‍वाद घ्‍यावा, असे आवाहन व्‍हीआयपीएलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक प्रशांत उगेमुगे व अध्‍यक्ष ज्‍योत्‍स्‍ना प्रशांत उगेमुगे यांनी केले आहे.

Previous article#Maha_Metro | जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांची मेट्रो भवनला सदिच्छा भेट
Next articleGaneshotsav 2022 | अगले 10 दिनों में ध्यान रखें ये 7 बातें, ऐसा करने से भी बचें
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).