Home मराठी पीएम मोदी आज नेपाळ दौऱ्यावर, बुद्ध पौर्णिमेच्या विशेष प्रार्थनेत सहभागासाठी लुंबिनीला पोहोचणार

पीएम मोदी आज नेपाळ दौऱ्यावर, बुद्ध पौर्णिमेच्या विशेष प्रार्थनेत सहभागासाठी लुंबिनीला पोहोचणार

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लुंबिनीला भेट देणार आहेत. PM मोदी सकाळी 10.30 वाजता नेपाळला पोहोचतील. प्रथम, पंतप्रधान मायादेवी मंदिराला भेट देतील आणि एका विशेष प्रार्थना सभेला उपस्थित राहतील. याशिवाय बुद्ध पौर्णिमेनिमित्त अशोक स्तंभासमोर तुपाचा दिवा लावून बोधीवृक्षाला जल अर्पण करतील. 2014 मध्ये त्यांनी हे झाड नेपाळला भेट दिले होते.

पंतप्रधान मोदी 2566व्या बुद्ध जयंती सोहळ्यालादेखील उपस्थित राहणार आहेत आणि बौद्ध विद्वान आणि भिक्षूंसह नेपाळ आणि भारतातील लोकांना संबोधित करतील. पंतप्रधानांच्या या भेटीचा उद्देश ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेसह नेपाळ आणि भारत यांच्यातील शतकानुशतके जुने धार्मिक संबंध वाढवणे हा आहे.

नेपाळमध्ये भारताच्या पुढाकाराने उभारल्या जाणाऱ्या इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेजची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. या ठिकाणी बौद्ध परंपरेचा अभ्यास होणार आहे.

दुपारी भारत आणि नेपाळच्या पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ मेजवानीही ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये नेपाळी पंतप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळासह उपस्थित राहणार आहेत.

Previous articleशेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल – सुनील केदार
Next articleनागपूर, मुंबई, बोरिवली, नाशिकसाठी एसटीची स्लीपर कोच बससेवा सुरू; चांगला प्रतिसाद
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).