Home Maharashtra महाराष्‍ट्र अर्थसंकल्‍प । 2022 च्‍या विभागवार वेगळ्या तरतुदी, वाचा फक्‍त ‘आत्मनिर्भर खबर...

महाराष्‍ट्र अर्थसंकल्‍प । 2022 च्‍या विभागवार वेगळ्या तरतुदी, वाचा फक्‍त ‘आत्मनिर्भर खबर डॉट कॉम’ वर

प. महाराष्ट्र : 10,423 कोटी
 • पुण्याजवळ 300 एकरांत अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प. सर्व उपचार पद्धती उपलब्ध हाेतील.
 • पश्चिम महाराष्ट्रात विविध महापुरुषांच्या शाळांसाठी अनेक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
 • पुणे रिंग रोडसाठी 1500  कोटी दिले जातील. तसेच पुणे मेट्रो लाइन -3 साठी 8313 कोटींचा निधी.
 • साताऱ्यात शिवसागर जलक्रीडा पर्यटन प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये. बिबट्या सफारीसाठी
 • 60 कोटी रुपये. फुलेवाडा स्मारकासाठी 100 कोटी.
 • वढू येथे संभाजी महाराज स्मारकासाठी 250 काेटी.
 • पंढरपूर मंदिर विकासासाठी 75 कोटी रुपये.
उत्तर महाराष्ट्र : 150 कोटी रुपये
 • धुळे जिल्ह्यातील साक्रीत सौर ऊर्जा प्रकल्प
 • शिर्डी विमानतळासाठी 150 कोटींची तरतूद.
 • नाशकातील दिंडोरीत आदिवासी औद्योगिक क्लस्टर.

मुंबई-कोकण : सुमारे 2280 कोटी
 • लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालयासाठी १०० काेटी.
 • गेटवे लाइट अँड साउंड शोसाठी 500 कोटी.
 • मुंबईत मराठी भाषा भवनासाठी 100 कोटी.
 • मुंबईत जलवाहतुकीसाठी 330 कोटींची तरतूद.
 • रेवस ते रेड्डी सागरी मार्ग 897 कोटी रुपयांचा निधी.
 • रत्नागिरी विमानतळ 100 कोटी रुपयांचा निधी
 • दापोलीतील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला संशोधनासाठी 50 कोटी रुपयांचा निधी.
 • महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या भाग भांडवल मर्यादेत वाढ. 173 मासळी केंद्रांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 50 कोटी रुपयांची तरतूद.
 • टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर व हॉस्पिटलला निधी.
विदर्भ : सुमारे 905 कोटी रुपये
 • गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाची सर्व कामे डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन. त्यासाठी 853 कोटी.
 • नागपूर जिल्ह्यात 24614 सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम. रोहयोतून 43902 सिंचन विहिरींची कामे.
 • अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे शेळी समूह योजनेंतर्गत श्रेणीवर्धन व क्षमता वाढ. प्रत्येक महसुली विभागात एक
 • शेळी समूह प्रकल्प. 50 काेटींचा निधी. नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेची उभारणी केली जाणार.
मराठवाडा : सुमारे : 353 कोटी
 • वसमत, हिंगोली येथे मा. बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद.
 • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त संशाेधन 50 कोटींचा निधी.
 • जालन्यात 365 खाटांच्या नवीन प्रादेशिक मनोरुग्णालयांचे बांधकाम. 60 कोटींची तरतूद.
 • नांदेडच्या खादी ग्रामोद्योग केंद्रासाठी 25 कोटी रुपये.
 • औरंगाबादेतील वंदे मातरम सभागृहासाठी 43 कोटी.
 • मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमांसाठी 75 कोटी.
Previous articleनागपुरात सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन, 19 मार्च ते 22 मार्च दरम्यान धरमपेठ येथे आयोजन
Next article#EPFO | घटाईं PF की ब्याज दरें, 2021-22 में प्रोविडेंट फंड पर मिलेगा 8.1% ब्याज
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).