Home Maharashtra नवाब मलिकांच्या कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ, ईडीने बॉम्बस्फोटांशी संबंधित गोपनीय जबाब कोर्टासमोर...

नवाब मलिकांच्या कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ, ईडीने बॉम्बस्फोटांशी संबंधित गोपनीय जबाब कोर्टासमोर ठेवला

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबीयांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर काही वेळापूर्वी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. मलिक यांच्या पुढील कोठडीबाबत न्यायालयात दोन तास युक्तिवाद सुरू होता. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग ईडीच्या वतीने हजर झाले, तर अमित देसाई आणि तारक सय्यद यांनी मलिक यांची बाजू मांडली.

कोर्टातील सुनावणीदरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी 1993च्या बॉम्बस्फोटांशी संबंधित एक गोपनीय जबाब कोर्टासमोर ठेवला आहे. मलिक आजारी असल्याने आणि रुग्णालयात दाखल असल्याने त्यांचे जबाब नोंदवता येणार नाहीत, असे सांगून एएसजी यांनी न्यायालयाला त्यांच्या कोठडीत सहा दिवसांची वाढ करण्यास सांगितले. ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाने मलिक यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिक यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि ईडीने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा खटला रद्द करण्याची मागणी केली. मलिकांनी आपल्या याचिकेत आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे आणि त्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे.

मलिक यांच्यानंतर आता त्यांच्या कुटुंबाभोवतीचा फास आवळला जात आहे. आज त्यांचा मुलगा फराज मलिक याला चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले. मात्र, मंगळवारी पत्र पाठवून फराजने ईडीकडे एक आठवड्याची मुदत मागितली होती.

25 फेब्रुवारी रोजी पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नवाब मलिक यांना सोमवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्यांना पुन्हा मुंबईतील बॅलार्ड स्टेट येथील ईडी कार्यालयात आणण्यात आले. ते ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत होते, जी आता वाढवून 7 मार्चपर्यंत करण्यात आली आहे.

Previous article14 जिल्हे अनलॉक, मराठवाड्यात निर्बंध कायम; नाट्यगृहे, थिएटर्स, रेस्तराँ पूर्ण क्षमतेने होणार सुरू
Next articleआजपासून बारावीची परीक्षा । 2 वर्षांनी ऑफलाइन परीक्षा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांची नोंदणी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).