Home Award सुप्रिया सुळेंना सलग सातव्यांदा ‘संसदरत्न पुरस्कार’, महाराष्ट्रातील ‘हे’ चार खासदार संसदरत्न

सुप्रिया सुळेंना सलग सातव्यांदा ‘संसदरत्न पुरस्कार’, महाराष्ट्रातील ‘हे’ चार खासदार संसदरत्न

504

राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशनकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी देशातील 11 खासदारांना हा पुरस्कार देण्यात आला असून, त्यात महाराष्ट्राच्या चार खासदारांचा यात समावेश आहे. सुप्रिया सुळेसह शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान, भाजपच्या खासदार हिना गावित या चार जणांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आल आहे. संसदेतील कामगिरीतल्या सातत्याबद्दल सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना ‘संसद विशिष्ट रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यंदा एकूण 11 जणांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला असून, त्यात सुप्रिया सुळे सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. यंदा ज्या अकरा जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यामध्ये महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश आहे. तर रिव्हॉलुशनरी सोशलिस्ट पक्षाचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन, तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय, काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा आणि भाजपचे खासदार विद्युत बरान महातो, सुधीर गुप्ता राज्यसभेतील बिजू जनता दलाचे खासदार अमर पटनायक, कम्युनिट पार्टीचे खासदार के. के. रागेश यांचा देखील यात समावेश आहे.

संसदरत्न पुरस्कार सोहळ्याची 12 वी आवृत्तीचा कार्यक्रम 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे. फाउंडेशन दिलेल्या माहितीनूसार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे, रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीचे खासदार एन.के. प्रेमचंद्रन आणि शिवसेना खासदार श्रीरंग अप्पा बार्ने यांना कामगिरीतल्या सातत्याबद्दल ‘संसदरत्न विशिष्ट रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्राइम पाइंट फाउंडेशनचे संस्थापक अंत श्रीनिवासन यांनी सांगितले की, PRS इंडियाद्वारे प्रदान केलेल्या डेटाच्या आधारे, 17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून ते हिवाळी अधिवेशन 2021 च्या समाप्तीपर्यंतच्या त्यांच्या एकत्रित कामगिरीचे मूल्यांकन करून पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली संसदरत्न पुरस्कार समिती होती. भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टीएस कृष्णमूर्ती हे सह-अध्यक्षपदी होते. माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्या सुचनेनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संसद सदस्यांना सन्मानित करण्यासाठी या पुरस्कारांची स्थापना करण्यात आली आहे.

Previous articleराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 2 दिवसीय संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता
Next articleकामाठीपुरा येथील रहिवाशांची चित्रपटाविरोधात न्यायालयात धाव, म्हणाले- कामाठीपुराची बदनामी होतीये
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).