Home Crime #Nagpur। शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्याने नाराज चार अल्पवयीन मुलांनी केली सामाजिक कार्यकर्त्याची हत्या

#Nagpur। शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्याने नाराज चार अल्पवयीन मुलांनी केली सामाजिक कार्यकर्त्याची हत्या

486

नागपूर ब्युरो : चकलस करू नका, असं सांगून योग्य पद्धतीनं वागा, असं म्हणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी चार अल्पवयीनं मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही मुलं सिगारेट पिऊन येणाऱ्या-जाणाऱ्यांची चकलस करत होते.

नागपुरात हत्या सत्र सुरूच आहे. हत्याच्या घटना थांबत नसल्याने नागरिक हैराण आहेत. आज पहाटे आणखी एक हत्या झाली. मृतक सुनील जवादे असून ते परिसरातील सामाजिक काम करतात. पहाटेच्या वेळी त्यांच्यावर चार जणांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे अल्पवयीन आहेत. काहीतरी शुल्लक कारणावरून ही हत्या झाल्याचं पुढे येत आहे. दोन आरोपी शिक्षण घेत आहेत. तर दोघांनी शिक्षण सोडलं आहे. हे युवक परिसरात दारू सिगारेट प्यायचे. चकलसबाजी करत असताना त्यांना जवादे यांनी टोकलं. त्याचा राग मनात धरून त्यांनी ही हत्या केली असल्याचं सांगितलं जातंय. पोलिसांनी चारही आरोपी ना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती एसीपी गणेश बिरासदार यांनी दिली. शुल्लक कारणावरून आरोपीनं एका सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या केल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वातावरण शांत केलं.

चाय बनविण्याऐवजी तोडला पतीचा हात

नागपूर : कौटुंबिक वादातून चाय बनविण्यास सांगणाऱ्या पतीची पत्नीने चांगलीच धुलाई केली. पाईपनं मारल्यानं सय्यद मोईन यांचा हात जखमी झाला. ही घटना सदर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. प्राप्त माहितीनुसार, पत्नी नसरीन ही पती मोईनवर शंका घेत होती. यामुळं हा वाद वाढला. मंगळवारी सकाळी मोईननं नसरीनला चाय बनविण्यासाठी सांगितलं. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

नसरीन यांनी प्लास्टिकच्या पाईपनं पतीला चांगलीच मारहाण केली. यात जखमी झाल्यानं मोईन सदर पोलीस ठाण्यात पोहचला. त्यानं पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. यापूर्वी नसरीन यांनीही पती मोईन मला मारहाण करत असल्याची तक्रार केली होती. काही दिवसांपूर्वी मोईननही पत्नीविरोधात मारहाण करीत असल्याची तक्रार दाखल केली होती. दोघांमध्ये नेहमी वाद होत असल्यानं मुला-मुलींना त्यांनी पटणा येथे शिकण्यासाठी पाठविले आहे. दुसऱ्या एका घटनेत मानकापुरातल्या 33 वर्षीय आशीष पाटील यांनी मंगळवारी सकाळी कौटुंबिक कारणानं पत्नी काजलला मारहाण केली होती.

Previous articleGood News । भारतात पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त, NFHS सर्वेक्षणाचे आकडे जाहीर
Next articleFive Young Bikers from Nagpur Flagged off on 4500KM motorcycle expedition
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).