Home Legal #maharashtra । 24 तासात सेवेवर रुजू व्हा अन्यथा सेवासमाप्ती केली जाईल’, 2...

#maharashtra । 24 तासात सेवेवर रुजू व्हा अन्यथा सेवासमाप्ती केली जाईल’, 2 हजार 296 कर्मचाऱ्यांना नोटीस

499

मुंबई ब्युरो : एसटी महामंडळाचे विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. 24 तासांत कामावर हजर राहा नाहीतर सेवासमाप्ती केली जाईल. अशी नोटीस एसटी महामंडळाच्या वतीने कर्मचाऱ्यांना बजावण्यात आली आहे. यामध्ये चालक, वाहक, लिपीक आणि टंकलेखक यांचा समावेश आहे.

कामावर रुजू व्हा, अन्यथा सेवा समाप्ती करू, असा इशारा आधीच देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने दोन हजार 296 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे. आणि 24 तासांमध्ये कामावर रुजू व्हा, अन्यथा कारवाई होईल, असा अल्टिमेटम कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यानंतर अण्णांनी संपाला पाठिंबा दर्शवला असून, ते एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यासोबत पत्रव्यवहार करणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नये, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. राज ठाकरेंनी आत्महत्येच्या घटनांवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली. जर तुम्ही होणाऱ्या आत्महत्या थांबवल्या तर मी शासन दरबारी शब्द टाकू शकतो त्यामुळे तुम्ही आत्महत्येचे सत्र थांबवा अशी एक अटच संपकरी कर्मचाऱ्यांसमोर ठेवली.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. राज्य शासनाकडून संप मागे घेण्याबाबत वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.

#maharashtra । अखेर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित; संपत्तीही जप्त करण्याचे आदेश

Previous article#maharashtra । अखेर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित; संपत्तीही जप्त करण्याचे आदेश
Next article#Nagpur । शरद पवारांचा पुन्हा एकदा फडणवीसांना टोला, नितीन गडकरीचं कौतुक
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).