Home Maharashtra #nagpur । आरोग्य कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण, बावनकुळे यांनी दिली भेट

#nagpur । आरोग्य कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण, बावनकुळे यांनी दिली भेट

484

नागपुर ब्युरो : 29 सप्टेंबर 2021 नंतर नवीन सेवा प्रवेश नियम लागू झाल्यापासून जिल्हा परिषद वर्धा आणि जळगाव येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पण नागपूर विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांची पदोन्नती होऊन सुद्धा केवळ आदेश निर्गमित न केल्यामुळे नागपूर विभागातील आरोग्य कर्मचारी 28 ऑक्टोबर पासून बेमुदत आमरण उपोषणावर बसले आहेत.

या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असताना दुसरीकडे मात्र नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

आरोग्य कर्मचारी ते आरोग्य सहाय्यक पदोन्नती पात्र कर्मचारी कृती समिती च्या अंतर्गत उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आरोग्य कर्मचारी संवर्गातून आरोग्य सहाय्यक संवर्गात पदोन्नतीने पद स्थापनेचे आदेश त्वरित निर्गमित केले जावे, जेणेकरून आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर होईल व त्यांना यथोचित न्याय मिळेल.

Previous articleलोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त लोकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या: एच. के. पाटील
Next article#Gadchiroli। काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते सगुणा तलांडी यांचे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).