Home National @MOIL_LIMITED । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राम प्रसाद सिंह यांच्या हस्ते 31...

@MOIL_LIMITED । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राम प्रसाद सिंह यांच्या हस्ते 31 ला खाणी आणि रुग्णालयाचे लोकार्पण

526

नागपूर ब्युरो : केंद्रीय स्टील मंत्रालयांतर्गत येणा-या (मिनरल ऑइल इंडिया लिमिटेड) तर्फे , चिकला खाण येथे 2रा व्हर्टिकल शाफ्ट राष्ट्राला समर्पित करण्यासाठी तसेच त्यांच्या चिकला, गुमगाव, डोंगरीबुजुर्ग, तिरोडी आणि कांद्री या पाच खाणींच्या ठिकाणी रुग्णालयांचे उद्घाटन करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तिरोडी खाणीतील प्रशासकीय इमारत आणि बालाघाट खाणीतील जीटी वसतिगृहच्या लोकार्पणही होणार असून हा कार्यक्रम 31 ऑक्टोबर 2021 रोजी हॉटेल लेमेरिडियन, नागपूर येथे दुपारी 1 वाजता होणार आहे.

वरील सुविधांचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय स्टील मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह, केंद्रीय स्टील ग्रामीण विकास राज्यमंत्री ग्गन सिंग कुलस्ते आणि मॉईलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकुंद पी. चौधरी,यांच्या उपस्थितीत होणार आहे.

स्टील मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, प्रसारमाध्यमे , सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी कंपनीचे खाणीतील कर्मचारी आणि कामगारही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत

स्टील मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांची मॉईलला ही पहिलीच भेट आहे. या प्रसंगी ते तेथील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या वर्गाला संबोधित करतील आणि दुसऱ्या दिवशी ते बालाघाट खाणीलाही भेट देतील, जी आशियातील सर्वात खोल भूमिगत मॅंगनीज खाण आहे.

@narendramodi | पोप ने कोरोना के दौरान दुनिया भर के देशों की मदद करने पर भारत की तारीफ की

Previous article@asadowaisi | मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमकडून तिरंगा रॅलीची घोषणा
Next article#CREDAI | Property Expo Getting Overwhelming Response, Expo Concluding Today
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).