Home Naxal #gadchiroli । सुरजागड रॅलीमध्ये सहभागी होणा-या नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

#gadchiroli । सुरजागड रॅलीमध्ये सहभागी होणा-या नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

423
गडचिरोली ब्युरो : पोलीस उपविभाग एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या एटापल्ली पोस्टे हद्दीत मंगळवार, 26 ऑक्टोबर रोजी नागरिकांच्यावतीने सुरजागड उत्खननाच्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली. शांततापुर्वक चालु असलेल्या रॅलीमध्ये काही नक्षली सामिल असल्याबाबत, गोपनिय सुत्राकडून मिळालेल्या विश्वसनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान, रॅलीच्या सुरक्षेकरीता गोपनिय पद्धतीने तैनात असतांना जहाल नक्षली मुडा मासा झोही याच्यासह जनमिलीशिया सदस्य मैनु दोरपेटी या दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश आले आहे.

अटक करण्यात आलेला जहाल नक्षली मुडा मासा झोही वय 32 वर्षे हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल असलेल्या मौजा- गोरगुट्टा ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथील रहिवासी असून, त्याचेवर 27 फेब्रुवारी 2019 रोजी मौजा झारेवाडा, 15 मार्च 2020 रोजी मौजा बोडमेटा व 04 मार्च 2021 मौजा कोपर्शी (मुरुमभूशी) जंगल परिसरात झालेल्या चकमकीचे ३ गुन्हे दाखल आहेत. तो गटटा दलममध्ये भरती होवुन सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता. शासनाकडून त्याचेवर 2 लाख रुपयाचे बक्षीस जाहिर करण्यात आले होते.

जनमिलीशिया सदस्य मैनु दोरपेटी रा. बोडमेटा ता. एटापल्ली येथिल रहिवासी असून, त्याचा 18 सप्टेंबर 2021 रोजी सोमाजी चैतु सडमेक रा. एटापल्ली या सामान्य नागरिकाची हेडरी ते सुरजागड रोडवर केलेल्या खुनाच्या गुन्हयामध्ये तसेच 11 मे 2021 रोजी झालेल्या गट्टा (जां.) पोस्ट वरील हल्ला अशा 2 गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. शासनाकडून त्यांचेवर 2 लाख रुपयाचे बक्षीस जाहिर करण्यात आले होते. तो नक्षल्यांच्या हिंसक कृत्यांमध्ये नेहमी सामिल होवून घातपाताच्या घटना घडवून आणण्यास नक्षल्यांना मदत करीत होता. जहाल नक्षली मुडा मासा झोही व मैनु दोरपेटी या दोन्ही नक्षलींच्या कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्यांचेवर एकुण 4 लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांचे नेतृत्वात विशेष अभियान पथकातील जवानांनी पार पाडली असून, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदर दोन्ही नक्षलवाद्यांना अटक करण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता परिश्रम घेतलेल्या जवानांचे कौतुक केले असून, नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. नक्षलवादयांनी हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

#samirvankhede | समीर वानखेडेंच्या विरोधात अखेर चौकशीची घोषणा, 4 अधिकाऱ्यांची नावही जाहीर

Previous article#samirvankhede | समीर वानखेडेंच्या विरोधात अखेर चौकशीची घोषणा, 4 अधिकाऱ्यांची नावही जाहीर
Next article#COVID19 । गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण; वर्षभरात दुसऱ्यांदा झाला कोरोना
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).