Home Education School News | द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपुर येथे “कृतज्ञता दिवस”...

School News | द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपुर येथे “कृतज्ञता दिवस” मोठ्या उत्साहात साजरा

588

नागपूर ब्युरो : द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल ,शंकरपूर येथे ऑनलाइन पद्धतीने कृतज्ञता दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी ,पालक व शाळेचे शिक्षकवृंद सहभागी झाले होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भाषणातून, कोलाज च्या माध्यमातून तसेच विविध वेशभूषेच्या माध्यमातून आपल्या ‘मातृभूमी ‘विषयी तसेच ‘अन्नदात्या ‘शेतकऱ्यांपासून ते देशाच्या ‘रक्षणकर्त्या’ सैनिकांपर्यंत कृतज्ञता व्यक्त केली.

शाळेचे पालकगण यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शिक्षकवृंदानी कोरोना महामारी सारख्या गंभीर परिस्थितीतही त्यांच्या पाल्यांप्रति परिश्रम घेत शिक्षण नियमितपणे सुरू ठेवले, खऱ्या अर्थाने त्यांनी आमच्या मुलांच्या आयुष्यात ‘कोरोनायोध्या’ची भूमिका बजावली. याशिवाय विद्यार्थी शाळेपासून सुरक्षिततेच्या नियमांचे मुळे दूर असले तरी अभ्यासक्रम पूर्ण होण्याकरिता शाळेचे प्राचार्य तुषार चव्हाण यांनी शाळेचे अद्ययावत संगणकीकरण करण्यात मोठा हातभार लावला व वेळोवेळी मार्गदर्शन केले, असे मत व्यक्त केले.

शाळेच्या शिक्षिका, पियरली भौमिक यांनी आपल्या ऑनलाइन छोटेखानी भाषणात आपल्या आयुष्याची जडणघडण होत असताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या अनेक व्यक्तींची मोलाची मदत होत असते. त्यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी त्यांना धन्यवाद देता यावे यासाठी हा दिवस आपण साजरा करतो असे मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेच्या अध्यक्षा सौ. ज्योती अय्यर ,सचिव सुरज अय्यर तसेच संचालक नंदलाल चौधरी सर हे अत्यंत दक्ष राहून जातीने प्रयत्न करतात त्यांच्या प्रतीही पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ऑनलाईन शिक्षण देत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यात, सतत पुढाकार घेत ,अत्यंत संयमी राहून शाळेच्या शिक्षकवृंदांना मार्गदर्शन करणारे व खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे शाळेचे प्राचार्य तुषार चव्हाण यांच्याप्रति शाळेचे शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद यांनी पुष्पगुच्छ देत कृतज्ञता व्यक्त केली. सरतेशेवटी शाळेच्या शिक्षिका, श्रीमती शफक अख्तर यांनी आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous articleविदेश व्यापार महासंचालनालय आणि नागपुर जिल्हा उद्योग केंद्राद्वारे 24 सप्टेंबर रोजी एक दिवसीय निर्यात संमेलनाचे आयोजन
Next articleMaharashtra । मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).