Home Beauty प्लॅटिनम इवारा प्रशंसा करतात अशा सामर्थ्यवान आणि कनवाळू महिलांची, ज्यांनी सन्मानाने वृद्धिंगत...

प्लॅटिनम इवारा प्रशंसा करतात अशा सामर्थ्यवान आणि कनवाळू महिलांची, ज्यांनी सन्मानाने वृद्धिंगत होणे निवडले

514

मुंबई ब्यूरो: महामारीच्या विनाशकारी दुसऱ्या लाटेमुळे समाजातील विविध वर्ग आणि स्तर यांवर दूरगामी परिणाम झाले. या काळात, महिलांनीच पुढाकार घेऊन नेतृत्व केले आणि आधार बनल्या, ज्यादारे संपूर्ण कुटुंब आणि समाज एकत्र धरून ठेवले गेले. जागतिक नेत्यांपासून आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांपासून ते गृहिणी आणि पगारदार व्यावसायिकांपर्यंत, जीवनाच्या विविध क्षेत्रातील स्त्रिया या सामर्थ्य, करुणा आणि लवचिकतेच्या प्रमुख नेतृत्व बनल्या. सहानुभूती, दयाळूपणा आणि चिकाटी यांसारख्या प्रशंसनीय मूल्यांचे प्रदर्शन करीत, स्त्रिया या प्रसंगी अनुकंपा आणि धैर्याने उभ्या राहिल्या. त्यांनी शक्ती शोधणे आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांसाठी कवच बनणे निवडले.
या आश्चर्यकारक स्त्रियांची ताऱ्यांपासून जन्मलेल्या धातू – प्लॅटिनम सोबत अचुकपणे तुलना झाली. कोट्यवधी वर्षांपूर्वी, एका उल्केच्या धडकेने या मौल्यवान पांढऱ्या धातूचे अवशेष मागे राहिले आणि तेव्हापासून ते खरोखरंच मौल्यवान गोष्टींचे प्रतीक बनले आहे.

धातू म्हणून प्लॅटिनम हा दागिन्यांमध्ये आढळणाऱ्या इतर धातूंपेक्षा अधिक घन असल्याने तो गुण त्याला सामर्थ्याचे खरे प्रतीक बनवितो. हा धातू लवचिक, अपरिवर्तनीय आहे आणि काळाच्या कसोटीत खरा उतरणारा आहे, काळाच्या ओघात तो त्याचे स्वरूप किंवा नैसर्गिक पांढरेपणा कधीही गमावत नाही, जे या अनुकरणीय स्त्रियांच्या निर्भय भावनेला प्रतिबिंबित करते. हे तेच गुण आहेत जे आजच्या तरुण, सामर्थ्यवान आणि कनवाळू स्त्रियांना योग्य आदरास पात्र बनवतात. प्लॅटिनम इवारा स्त्रियांना सूक्ष्म कलाकृतींच्या या संग्रहासह वंदन करते.

संग्रहातील प्लॅटिनम इवारा मधील प्रत्येक कलाकृती सामर्थ्य, करुणा आणि सहानुभूतीचे वर्णन करते. डिझाइन पॅलेट हे पैलू, विघटनकारी रेषा आणि चौकट यांचे मिश्रण आहे, जे आकाराबद्दल भ्रम निर्माण करतात. हे कोनीय, टोकदार आणि तरीही गोलाकार, वक्र आणि खोबण या आयामी स्वरूपात असतात. या कलाकृतींमध्ये स्टेटमेंट प्लॅटिनम रिंग्ज, क्लिष्ट डिझाइन केलेले गळ्यातील प्लॅटिनम दागिने आणि अगदी कानातले आणि ब्रेसलेट सारखे सगळे आकर्षक दागिने आहेत.

संग्रहातील प्रत्येक दागिना अद्वितीय आणि प्रशंसा-पात्र आहे, याठिकाणी प्लॅटिनम इवारा मधील आमचे काही लोकप्रिय निवडक दागिने आणि ते आजच्या आधुनिक स्त्रीसाठी ते काय सूचित करतात ते इथे आहे: या उत्कृष्ट कानातल्यांच्या केंद्रस्थानी असलेले प्लॅटिनमचे वेष्टन तिच्यामध्ये असलेली अफाट आंतरिक शक्ती प्रतिबिंबित करते, तर त्यातून उत्पन्न होणारे किरण ती तिच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी नैसर्गिकरित्या कशी प्रेरणा देते ते दर्शवितात. तिच्या दुर्मिळ शक्तीला पूरक असलेल्या धातूमध्ये बनवलेला हा दागिना प्रत्येक प्रसंगी तिने दाखविलेले धैर्य व्यक्त करतो.
गोलाकार पद्धतीने मॅट फिनिश केलेल्या प्लॅटिनम सोबत हिरे-जडीत षटकोनी आकृतिबंध, करुणा आणि सामर्थ्य दर्शवतात, जे ती जीवनाच्या वर्तुळात अभूतपूर्व आव्हानांना सामोरे जाताना त्यातून उजळून निघण्यासाठी समान प्रमाणात वापरते.

जरी जीवन दिशा बदलत असते तेव्हा त्या गोंधळातही ती शांत असते. हे सुशोभित प्लॅटिनम चौकोन परीक्षेच्या घडीला तिच्या धैर्याचे प्रतिनिधित्व करतात, तर त्यांच्यामधून जाणारा बंध हा मार्गाच्या प्रत्येक वळणावर व्यवस्थितपणे पुढे जाण्याच्या तिच्या भावनेला सूचित करतो. हिऱ्याने गुंफलेला मध्यभाग एका स्त्रीचे आंतरिक सामर्थ्य आणि धैर्याचे प्रतीक दर्शवितो ज्याद्वारे तिच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला ती पार करू शकते. ती सकारात्मकतेचा किरण आणते आणि अन्यथा नैराश्याने ग्रासलेल्या जगाला आशा दाखवते. ती ताज्या हवेचा तो श्वास आहे जो कृपेने उद्भवतो.

प्लॅटिनमच्या बंधाने एकत्र धरून ठेवलेले, दोन विरोधाभासी त्रिकोण अंधार आणि प्रकाशाचे (यिन आणि यांगचे) चित्रण करतात – जे चांगल्या आणि वाईट काळात स्वतःला तिने कसे एकत्र धरून ठेवले आहे ते प्रतिबिंबित करतात. ती तिच्या असुरक्षिततेत सर्वाधिक सामर्थ्यवान असते आणि तिच्या दयाळूपणात सर्वाधिक लवचिक असते.
भारतभरातील प्रमुख किरकोळ दागिन्यांच्या दुकानांमध्ये उपलब्ध.

Previous articleBigg Boss OTT | Two contestant evicted in second week!!
Next articleMaharashtra | पहले फिसली ज़बान फिर फंसे नारायण राणे, नास‍िक पुल‍िस ने द‍िया गिरफ़्तारी का आर्डर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).