Home हिंदी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, बेछूट गोळीबार; 1 जवान शहीद, 1 जखमी

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, बेछूट गोळीबार; 1 जवान शहीद, 1 जखमी

764

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ले सुरूच आहेत. कोठी गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार ते दोघेही जवान साध्या वेशात दुकानात खरेदीसाठी गेले होते. त्याचवेळी हा हल्ला झाला.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. दुष्टांत नंदेश्वर असे शाहिद जवानाचे नाव आहे. दिनेश भोसले नावाचा जवान या हल्यात जख्मी झाला आहे. कोठी या गावात नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. याआधी भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते.गडचिरोली पोलिसांच्या वेगवेगळ्या कारवायांमुळे नक्षल वादी घाबरलेले आहेत. याच मुळे असे हल्ले करण्यात येत आहे. गडचिरोली चे पोलीस अधीक्षक शैलेश बालकवडे स्वतः नक्षल्यांच्या विरोधातील ऑपरेशन सांभाळत आहेत.

दरम्यान या भ्याड हल्या बद्दल कडताच राज्यात विविध भागात कार्यरत असलेल्या गडचिरोली पोलीस दलात काम केलेल्या माजी अधिकाऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे कि नक्षलवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचे योग्य उत्तर गडचिरोली पोलीस नक्कीच देणार.