Home Health Maharashtra | शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, 31 मार्चला होणार शस्त्रक्रिया

Maharashtra | शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, 31 मार्चला होणार शस्त्रक्रिया

मुंबई ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. येत्या बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आजपासूनचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, ब्रीच कँडीमध्ये शरद पवारांची तपासणी झाल्यानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहेत. शिवाय 31 मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे शरद पवारांचे आजपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

Previous articleशरद पवार-प्रफुल्ल पटेल की अमित शाह से मुलाकात की खबरों को नवाब मलिक ने नकारा
Next articleGadchiroli । खोब्रामेंढा जंगलात झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here