Home Farmer Chandrashekhar Bawankule । शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजारांची मदत द्या, ड्रोनद्वारे पंचनामे...

Chandrashekhar Bawankule । शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजारांची मदत द्या, ड्रोनद्वारे पंचनामे करा

593

नागपूर ब्युरो : गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडा – विदर्भात पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन आणि कापसाचं हातातोंडाशी आलेलं पीक हातचं गेलंय. त्यामुळे राज्य सरकारने तीन दिवसांत पीक नुकसानीचे पंचानामे करावे, जिथे पुरामुळे प्रत्यक्ष जाऊन पंचनामे शक्य नाही, तिथे ड्रोनच्या मदतीनं पंचनामे करावे आणि सात दिवसांत हेक्टरी 25 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

मागच्या दोन महिन्यांचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पुरामुळं जीवितहानी आणि वित्तहानी झाली. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे झाले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी हेक्टरी 25 हजार द्यावी असल्याचं म्हटलं होतं. शेतकऱ्यांना येत्या 7 दिवसात तातडीनं मदत द्यावी, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. आमची मागणी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मिळावी अशी आहे मात्र सरकारनं किमान 25 हजार रुपये शेतकऱ्यांना येत्या सात दिवसात द्यावेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Previous articleWorld Heart Day 2021 | वेट मेंटेन करने से नहीं होता ह्रदय रोग : डॉ. रिचा जैन
Next articleInternet Blackout । आत्ताच तपासून घ्या आपली उपकरणे नाही तर उद्यापासून इंटरनेट सेवा होणार बंद
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).